top of page

‘२८ वे तरुणाई शिबिर सातपुडयाच्या कुशीत' 

सातपुडा पर्वत रांगांच्या पायथ्याशी 'सालईबन' हे पर्यावरणसंपन्न आहे. आदिवासी बांधव, शहरातील निसर्गप्रेमी आणि शासन प्रशासन यांच्या लोकसहभागातून पर्यावरणसंवर्धनाचं हे काम उभं राहत आहे. 

महात्मा गांधी लोकसेवा संघ, चालठाणायांच्या विश्वस्ततेखालील व भारतरत्न आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीतील पावन जमिनीवर गेल्या पाच वर्षापासून खामगाव येथील तरुणाई फाउंडेशनही संस्था कार्यरत आहे. विशेषतः पर्यावरणावरील कामाला प्राधान्यदेत शेती, आरोग्य, आपत्तीव्यवस्थापन, शिक्षण, क्रीडा आणि आदिवासी विकास या क्षेत्रात कार्य सुरू आहे. 

पूर्वी उजाड असलेल्या माळरानावर आता हिरवळ दिसू लागली आहे. पर्यावरण व शाश्वत शेतीचे एकमूर्त स्वरूप म्हणून सालईबनच्या निर्मितीचा संकल्प घेतला आहे. सातपुड्याच्या डोंगरावर घनदाट जंगल पुन्हा दिसावं, दुर्मिळ वनौषधी, आदिवासींची संस्कृती जतन करावी व निसर्गचक्राचा लाभ परिसरातील शेकडो गावांना होऊन सर्वांचे जीवनमान सहज सुलभ व्हावे यासाठी विविध उपक्रम आणि माध्यमातून या ठिकाणी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. सरकारला, समाजाला, निसर्गाला दोष देण्याऐवजी समाजावरील समस्या सोडविण्यासाठी कृती करण्यावर आमचा भर राहिला आहे. सामाजिक कार्यकरीत असताना विरोध हा स्वाभाविक पणे होतो पण त्याला संघर्षाचे स्वरूप न देता समन्वयाची भूमिका ठेवत आज तरुणाई फाउंडेशन तिथे काम करत आहे.  

तरुणाईने का सहभागी व्हावं? 

 डॉ. रवींद्र व डॉ.स्मिता कोल्हे काय काय करणार आणि कुठपर्यंत? यावर उपाय म्हणून समाजातील सर्वात ऊर्जा संपन्न घटक म्हणून ज्यांना पाहिले जाते हे त्या तरुणांना हाताशी घेता येईल हा विचार मनात आल्याने 1997 पासून तरुणाई शिबिराचे आयोजन करण्यास सुरुवात केली. हे शिबिर फक्त मेळघाट पुरते मर्यादित न राहता महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये व्हावं या मध्ये तरुणांना असंग्रह, शरीरश्रम, निसर्ग, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिकपरिस्थितीची, साहसीपणाची आणि त्यांच्या स्वत्वाची प्रेरणा ऊर्जा निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. मेळघाट व सातपुड्यातील 

जैवविविधता माती आणि माणुसकीच माणूस पण जपणारी माणसंयांची ओळख करून देण्यासाठी येथील सर्वांगीण विकासासाठी तरुणांना 

आत्मनिर्भर स्वयंपूर्ण करणे हेच आमचे ध्येय. 

- डॉ.रवींद्र व डॉ.स्मिता कोल्हे. 

शिबीरामध्ये काय असेल.. 

०१) डॉ. कोल्हे दांपत्य यांच्याशी संवाद.     ०२) वनऔषधी व शाश्वत शेतीची ओळख. 

०३) श्रमदान.                                       ०४) आदिवासी जनजीवनाची ओळख. 

०५)आदिवासी गावांना भेटी.                    ०६) विविध मान्यवरांच मार्गदर्शन. 

०७) तुमच्यात दडलेला खरा हिरो.             ०८) महत्वाच्या विषयावर गटचर्चा 

०९) जंगलसफ़ारी                                   १०) समाजाच्या जिवंत कथा 

११) रात्रभ्रमंती आणि आकाश निरिक्षण        १२) पक्षीनिरीक्षण 

 
 

निवडप्रक्रिया - 

१) आपला अर्ज पडताळणीत अर्ज निवडला गेला असल्यास २० ते २१ या तारखेपर्यंत तुम्हाला संदेश किंवा ई-मेलच्या माध्यमातून कळवले जाईल.  

२) अर्ज पडताळणीत आपली निवड झाली असल्यास आपली मुलाखत घेण्यात येईल. मुलाखतीचे माध्यम फोन कॉल असेल. 

हि मुलाखत २३ ते २४ तारखेपर्यंत घेतली जाईल. 

३) मुलाखत यातून अंतिम निवड झालेल्या ७० शिबिरार्थीची अंतिम यादी २५ जानेवारी रोजी जाहीर केली जाईल. 

 
 

अर्जा संबधीत सुचना  

१) खालील अर्ज सुवाच्य अक्षराने हाताने लिहून scan copy किंवा फोटो 28tarunaaicamp@gmail.com या मेल वर पाठवा. किंवा खाली दिलेल्या 

लिंक मधे अप्लोड करु शकता.

(ई-मेलचा विषय 28tarunaaicamp लिहावा) आपली उत्तरे नेमक्या शब्दात आणि मोकळ्या जागेत लिहावी. 

 २) अर्जात नमूद केलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे लिहिणे बंधन कारक आहे.  

३) तरुणाई शिबिराची वयोमर्यादा १८ ते २५ वर्षे आहे. कृपया २५ वर्षाच्या वरील व्यक्तीने अर्ज पाठवू नये. 

४) शिबिरासाठी कमीत कमी ८००ते जास्तीत जास्त १५०० पर्यंत आपण आम्हाला मदत करू शकता.  

५) शिबिरासाठी अर्ज भरणे आवश्यक आहेत. शिबिर कालावधीत पूर्णवेळ / पूर्ण दिवस हजर राहणे बंधन कारक आहे म्हणून ८ ते १५ फेब्रुवारी २०२० या कालावधीचा विचार करूनच अर्ज भरावा.  

६) अर्ज भरण्याची अंतिम तारीख १७ जानेवारी २०२० (वेळ २३.५९मिनिटं) आहे. या नंतर आलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. 

७) शिबिर कालावधीत आपल्याला १० दिवस मोबाईल वापरण्याची परवानगी नाही याची नोंद घ्यावी. 

८) आपली निवड झाली असल्यास आपल्याला ई-मेल मार्फत कळवले जाईल त्यामुळे आपला योग्य 

ई-मेल आयडी नमूद करावा. 

९) एकदा निवड झाल्यानंतर शिबिरार्थीनी शिबिराला येणे आवश्यक आहे ऐनवेळी प्रवेश रद्द करू नये.                 (प्रवेश रद्द केल्यास प्रवेश फी परत मिळणार नाही.) 

१०) कृपया आपण शारीरिकदृष्ट्या सक्षम असाल तरच आणि शिबिरावेळी वेळापत्रकाचे पालन करणार असाल तरच शिबिरासाठी नोंदणी करावी. 

शिबिरासाठी फी कशाला ? 

हे शिबिर " चला तर मग भाकरी पलीकडचं जगणं शोधूया " यावर आधारित असते. स्वतःच्या चौकटी बाहेर अनुभव घेण्यासाठी टिम तरुणाई म्हणजेच तरुण युवकांनी येऊन तरुणासाठी घेतले जाणार हे शिबिर.म्हणून टिम तरुणाई हा एक विचार झाला आहे.आता तरी आर्थिकबाब भक्कम नाही 

पण विचारांच्या बाबतीत तडजोड नाही. म्हणून ना नफा ना तोटा या तत्ववार आधारित तुमच्या सोयीप्रमाणे ते म्हणतात ना काहीतरी देणे लागतं... तर जास्तीत जास्त 1500 रु ते कमीत कमी 800 रु पर्यत आपण आम्हाला मदत करू शकता.टिम तरुणाई शिबिराच्या बाबतीत देण्यात कमी पडणार 

नाही बाकी तुमच्यावर.... 

शिबिराचे वेळापत्रक अंदाजे खालील प्रमाणे राहील. 

05.00 To 05.30am   - Refreshment  

05.30 To 06.00am   - Kadha 

06:00 To 06.30am   - Yoga  

06.30 To 06.45am   - Prayer 

15 min                        - Break 

07.00 To 11.00am     - Shramadaan / Uphar 

11.00 To 12.00pm     - Bath 

12.00 To 01.30pm    - Aaina Dekho 

01.00 To 02.30pm   - Premahar  

02.30 To 03.00pm  - Rest 

03:00 To 04.30pm  - Manthan 

15 min                        - Break 

04.45 To 06.00pm   - Activity or Aaina Dekho 

06.00 To 07.00pm   - 100 gram Zindagi 

07.00 To 08.00pm   - Zindagi Guljar hai 

08.00 To 09.00pm   - Premahar 

15 min                     - Break  

• नोंदणी अर्जासंबधी अधिक माहितीसाठी...

  कोमल- 9175196340 विष्णू- 7038062114 शिवा- 7972584371 •  

शिबिर संदर्भात अधिक माहीतीसाठी...

धनश्री- 7709719742 अभिषेक- 9730843058 प्रशांत- 8208382708  

(All rights reserve, नियमांमध्ये बदल करण्याचे सर्व अधिकार टीम तरुणाईकडे राखीव आहेत) 

Subscribe to Our Newsletter

Thanks for submitting!

CONTACT >

T: 123-456-7890

F: 123-456-7890

E: info@mysite.com

© 2020 by Team Tarunaai
Proudly created by Creativemit

bottom of page